Mumbai-Pune Highway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अवजड वाहनांना बंदी! ‘या’ तारखेदरम्यान वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय

गणेशोत्सवाच्या काळात महामार्गांवर होणारी प्रचंड गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Mumbai-Pune Highway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अवजड वाहनांना बंदी! ‘या’ तारखेदरम्यान वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय

Mumbai-Pune Highway Traffic: गणेशोत्सवाच्या काळात महामार्गांवर होणारी प्रचंड गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड मालवाहतूक वाहनांना 18, 19, 20 आणि 25 सप्टेंबर रोजी, तसेच 26 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत महामार्गावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली असून, पुणे परिक्षेत्रातील महामार्ग सुरक्षा पथकाकडून या आदेशांची अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.

वाहने ट्रक टर्मिनल अथवा लॉजिस्टिक पार्कमध्ये पार्क करण्याचे निर्देश

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे तसेच जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांच्या चालक आणि मालकांनी या निर्णयाची वेळीच नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने, बंदीच्या कालावधीत कोणतीही अवजड वाहने थेट महामार्गावर आणू नयेत, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि वाहतूकदारांनी आपली वाहने आधीच सुरक्षित ठिकाणी, लॉजिस्टिक पार्कमध्ये किंवा ट्रक टर्मिनलवर पार्क करून ठेवावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – Maharashtra Weather: पावसाचा खेळ अजून संपलेला नाही! अंदमानमध्ये तयार होतेय नवी हवामान प्रणाली, महाराष्ट्रात काय परिणाम होणार?

नियम मोडणाऱ्यांवर होणार कडक कायदेशीर कारवाई 

दरम्यान, अधिसूचनेचे उल्लंघन करून महामार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल. बाप्पाला निरोप देताना महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी हा विशेष निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूकदार, सर्व वाहनचालक आणि नागरिकांनी महामार्ग सुरक्षा पथक तसेच पोलीस यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहनही पुणे वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number