Auto Rickshaw Strike: मराठी सक्तीविरोधात ऑटो-टॅक्सी चालक आक्रमक; मुंबईत 3 दिवस संप

मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत आंदोलकांनी रस्त्यावर उतरणाऱ्या इतर रिक्षाही बंद पाडण्याचा थेट इशारा दिला आहे.

Auto Rickshaw Strike: मराठी सक्तीविरोधात ऑटो-टॅक्सी चालक आक्रमक; मुंबईत 3 दिवस संप

Auto Rickshaw Strike: राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित कॅबचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबईतील रिक्षाचालकांनी तीव्र तीव्र संताप व्यक्त केला आहे. या नियमाच्या निषेधार्थ चालक संघटनेने सलग 3 दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत आंदोलकांनी रस्त्यावर उतरणाऱ्या इतर रिक्षाही बंद पाडण्याचा थेट इशारा दिला आहे. या अचानक पुकारण्यात आलेल्या संपामुळे मुंबईतील सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

RTO ची चाचणी अन् चालकांचा दंडावरून संताप

महाराष्ट्र सरकारने 2026 मध्ये मोटार वाहन नियमावलीत दुरुस्ती करत सर्व व्यावसायिक वाहनचालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक केले आहे. या नियमाची अंमलबजावणी तपासण्यासाठी RTO अधिकारी रस्त्यावर उतरून चालकांची तोंडी चाचणी घेत आहेत. यामध्ये प्रवास, भाडे, मीटरचे दर आणि UPI पेमेंट यांसारख्या दैनंदिन व्यवहारांवर प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, थोडेफार मराठी बोलूनही अधिकारी कठोर कारवाई करत असल्याचा आरोप चालकांनी केला आहे. 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंत आकारला जाणारा दंड भरणे अशक्य असल्याचे सांगत चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

'आम्ही 60 वर्षांचे, शाळेत गेलो नाही; आता मराठी कशी शिकणार?'

संपात सहभागी झालेल्या एका 60 वर्षीय रिक्षाचालकाने आपली व्यथा मांडताना सांगितले की, "आम्ही कधी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. या वयात आम्ही अचानक नवीन भाषा कशी शिकणार? जेवढे जमते तेवढे मराठी बोलण्याचा प्रयत्न करूनही आमच्यावर अव्वाच्या सव्वा दंड ठोठावला जात आहे. प्रवासीसुद्धा आमच्याशी हिंदीतच बोलतात." कांदिवली आणि बोरिवली यांसारख्या उपनगरांमध्ये संपाचा प्रभाव अधिक दिसून येत असून, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

हेही वाचा – Mumbai Mazgaon : बाप्पाच्या आगमनावेळी मुंबईत दोन गटात राडा! मूर्तीवर अंडी फेकली? नेमकं प्रकरण काय?

2026 च्या नव्या नियमावलीनुसार कारवाईची तरतूद

राज्य सरकारने 2026 च्या सुधारित नियमांनुसार ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित कॅबचालकांसाठी मराठीचे ज्ञान बंधनकारक केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचा परवाना किंवा बॅज रद्द करण्याची कठोर तरतूद यामध्ये आहे. मात्र, या निर्णयामुळे दैनंदिन पोट भरणाऱ्या चालकांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगत चालकांनी तीन दिवस रिक्षा पूर्णपणे बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number