जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबादच्या प्रोझोन मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार सुरू असल्याच उघडकीस आले आहे.
इथल्या दोन स्पा सेंटरवरमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय.
यामध्ये तीन ग्राहक, थायलंडच्या 12 मुली, 4 ग्राहक आणि 3 मॅनेजरला ताब्यात घेण्यात आलंय.
अनंतरा स्पा आणि दी स्ट्रेस हब स्पा अॅण्ड सलून या नावाने दोन स्पा सेंटर काही वर्षांपासून सुरू आहेत. दोन्ही स्पा सेंटरवर एकाचवेळी छापा मारल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.