जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडच्या सौदागरमध्ये स्त्रीरोगतज्ञ असणाऱ्या डॉक्टरांवर कोयत्याने वार करण्यात आले आहे. अमोल बिडकर असे या हल्ला झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. डॉ. बिडकर यांनी गर्भपात करण्यास नकार दिल्याने एका तरुणाने त्यांच्यावर कोयत्याने वार केले आहेत. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली असून डॉ. बिडकर या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
हल्ला करणारा तरुण हा एका अल्पवयीन मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या दरम्यान अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हल्लोखोर तरुणाने डॉ. बिडकर यांना गर्भपात करण्यास सांगितले. परंतु, अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गरोदर असल्याने त्यांनी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तरुणाने डॉ. बिडकर यांच्यावरच कोयत्याने हल्ला केला.