माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास नियमित तपासणीसाठी जेटलींना रुग्णालयात आणले होते. श्वास घेताना त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
कोण आहेत अरुण जेटली ?
अरुण जेटली भाजपचे जेष्ठ नेते.
देशातील प्रख्यात कायदेतज्ञ
2014-2019 मध्ये मोदी सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सरकारचे संकटमोचक
आरोग्याच्या कारणावरुन सरकारमध्ये सामिल होण्यास नकार
अर्थ,कायदा,संरक्षण, माहिती प्रसारण मंत्रालय अशी महत्वाची खाती हाताळली
अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांचे अंत्यत विश्वासू
2009 ते २०१४ मध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते पद
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत सक्रीय
१९९७४ मध्ये दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष
भाजपच्या युवा आघाडीचं अध्यक्षपद भूषवल
आणीबाणीला विरोध केल्यामुळे १९ महिने तुरुंगवास भोगला