‘अॅपल’चा सर्वात स्वस्त आयपॅड

वृत्तसंस्था, न्यू यॉर्क तुम्हाला जर स्वस्त iPad घ्यायचा असेल तर, तुमच्यसाठी आनंदाची बातमी आहे. ‘अॅपल’ कंपनीने सर्वात स्वस्त iPad लॉन्च केला आहे. अॅपलने आपल्या एज्युकेशन इव्हेंटमध्ये 9.7 इंचीचा स्वस्त आयपॅड लाँच केला आहे. आतापर्यंतचा अॅपलचा हा सर्वात स्वस्त iPad असल्याचे म्हटले जाते. हा आयपॅड विशेषत: विद्यार्थ्यांसाठी लाँच करण्यात आला आहे. 9.7 इंचीच्या या आयपॅडची 32 जीबी वायफाय […]

‘अॅपल’चा सर्वात स्वस्त आयपॅड

वृत्तसंस्था, न्यू यॉर्क

तुम्हाला जर स्वस्त iPad घ्यायचा असेल तर, तुमच्यसाठी आनंदाची बातमी आहे. ‘अॅपल’ कंपनीने सर्वात स्वस्त iPad लॉन्च केला आहे. अॅपलने आपल्या एज्युकेशन इव्हेंटमध्ये 9.7 इंचीचा स्वस्त आयपॅड लाँच केला आहे. आतापर्यंतचा अॅपलचा हा सर्वात स्वस्त iPad असल्याचे म्हटले जाते. हा आयपॅड विशेषत: विद्यार्थ्यांसाठी लाँच करण्यात आला आहे.

9.7 इंचीच्या या आयपॅडची 32 जीबी वायफाय मॉडलची किंमत 329 डॉलर म्हणजे जवळपास 21,500 रुपये असून विद्यार्थ्यांनसाठी हा iPad 299 डॉलर म्हणजे सुमारे 19,000 किंमतीत उपलब्ध असणार आहे. 32 जीबी वायफाय+सेल्यूलर मॉडलची किंमत 459 डॉलर म्हणजे 29,763 रुपये आहे. भारतात iPad 32 जीबी व्हर्जनची किंमत 28,000 रुपये तर 32 जीबी वायफाय+सेल्यूलर व्हर्जनची किंमत 38600 रुपये असेल. 

अॅपलच्या 9.7 इंचीच्या आयपॅडमध्ये A10 फ्यूजन चिप देण्यात आली आहे. आयपॅडच्या फ्रंटवर टच आयडी देण्यात आला आहे. तसंच यामध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. iPad एलटीई सपोर्टसोबत देण्यात आला असून यामध्ये 10 तासाचे बॅटरी बॅकअप मिळणार आहे, असा कंपनीने दावा केला आहे. ए10 फ्यूजन चिपसेट देण्यात आले असून फोनमध्ये रिअर कॅमेरा फुल एचडी व्हिडिओला सपोर्ट करतो. आयक्लाऊड स्टोरेजला वाढवून 5 जीबी ते 200 जीबी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी, फ्री रिव्हर्स आणि अन्य अॅप्स दिले आहेत. सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड फिनिश अशा तीन रंगात हा आयपॅड असून भारतात तो एप्रिल महिन्यात उपलब्ध होणार आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number