CBSE 10th Result 2026 Date: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (CBSE) इयत्ता 10 वीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CBSE इयत्ता 10 वीचा निकाल एप्रिल 2026 च्या अखेरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले गुण तपासू शकतील. गेल्या वर्षी 10 वीचा निकाल 13 मे रोजी लागला होता, मात्र यावर्षी तो लवकर लागण्याची चिन्हे आहेत.
घरबसल्या निकाल कसा तपासावा? (स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया)
निकाल जाहीर झाल्यानंतर तो पाहण्यासाठी आणि गुणपत्रक (Scorecard) डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल:
सर्वप्रथम CBSE च्या अधिकृत संकेतस्थळाला cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in भेट द्या.
होमपेजवर असलेल्या 'Class 10 Scorecard' किंवा 'CBSE Class 10 Result 2026' या लिंकवर क्लिक करा.
तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number), बैठक क्रमांक (Roll Number) आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
माहिती सबमिट केल्यानंतर तुमचे गुणपत्रक स्क्रीनवर दिसेल.
हे गुणपत्रक PDF स्वरूपात डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढून ठेवा.
मागील 10 वर्षांतील निकालांच्या तारखांचा आढावा
CBSE बोर्डाच्या निकालांच्या तारखांमध्ये दरवर्षी विविधता पाहायला मिळते. मागील काही वर्षांचा कल पाहिल्यास निकाल मे महिन्यात लागल्याचे दिसते.
इयत्ता 12 वीच्या निकालाबाबत काय आहे अपडेट?
10 वीच्या निकालापाठोपाठ 12 वीचा निकालही लवकरच अपेक्षित आहे. मागील कलानुसार, CBSE इयत्ता 12 वीचे निकाल साधारणपणे 20 मे 2026 च्या सुमारास जाहीर होऊ शकतात. सामान्यतः परीक्षा संपल्यानंतर 40 ते 41 दिवसांत निकाल लावला जातो. यावर्षी 12 वीच्या परीक्षा 10 एप्रिल रोजी संपणार आहेत. 12 वीच्या विद्यार्थ्यांनाही 10 वीप्रमाणेच अधिकृत संकेतस्थळावरून आपले लॉगिन तपशील वापरून गुणपत्रक डाउनलोड करता येईल. अधिकृत आणि ताज्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी www.cbse.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.