राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपणार आहे. पुढील राष्ट्रपतींच्या निवडणूकीसाठी निवडणूका घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तारीख जाहीर केली आहे. १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होईल. २१ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. २९ जूनपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येतील.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवणे हे विजय निश्चित करत नाही. मतदारांच्या मतांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे खासदार आणि आमदार मतांचे वेटेज करणारा राष्ट्रपती होतो. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इलेक्टोलर कॉलेजच्या संदस्यांच्या मतांचे एकूण वेटेज १०९८८८२ आहे. उमेदवाराल विजयासाठी ५४९४४१ मते मिळवणे आवश्यक आहे.
या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येणार नाही. संसद आणि विधानसभेत मतदान होईल. राज्यसभेचे महासचिव निवडणूक प्रभारी असतील. कोरोना प्रोटोकॉल पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या वेळी राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक १७ जुलै २०१७ रोजी झाली होती.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा
१५ जूनला अधिसूचना जारी होणार
२९ जून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
१८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक
२१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार