Delhi Crime Case: राजधानी दिल्लीत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार

देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना राजधानी दिल्लीतून संतापजनक घटना समोर आली आहे. दिल्लीत एका खासगी बसमध्ये महिलेसोबत सामूहिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Delhi Crime Case: राजधानी दिल्लीत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार

देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना राजधानी दिल्लीतून संतापजनक घटना समोर आली आहे. दिल्लीत एका खासगी बसमध्ये महिलेसोबत सामूहिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 मे रोजी दिल्लीत एका खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली, यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच घटनेत वापरलेली बसही जप्त केली आहे. 

हेही वाचा- Thane Crime : ठाणे महापालिकेत खळबळ! महिला डॉक्टरने 6 व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुले आहेत. नराधमांनी पीडित महिलेला राणी बाग परिसरातून बसमध्ये खेचले, आणि बस नांगलोई परिसराच्या दिशेने वळवली. यावेळी धावत्या बसमध्येच आरोपींनी महिलेवर अत्याचार करायला सुरुवात केली. घडलेल्या प्रसंगातून सावरत पीडितेने क्षणाचा विलंब न करता तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.

महिलेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी संबंधीत बस आणि त्या बसच्या ड्रायव्हरसह कंडक्टरला ताब्यात घेतले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान धावत्या बसमधील या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे दिल्लीत पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number