Amruta Fadnavis : ‘सणासुदीचे दिवस आहेत’; जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठ वक्तव्य

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील नियोजित असलेल्या आंदोलनावर आता अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपले मत व्यक्त केलेले आहे

Amruta Fadnavis : ‘सणासुदीचे दिवस आहेत’; जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठ वक्तव्य

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील नियोजित असलेल्या आंदोलनावर आता अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपले मत व्यक्त केलेले आहे. गणेशोत्सवाचा सण असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता याआधी व्यक्त करण्यात आली होती. मात्र,आता सणाचे दिवस लक्षात घेता आपला हा भाऊ सर्व काही शांततापूर्ण मार्गानेच पार पाडेल, असा विश्वास अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे.

हेही वाचा –Manoj Jarange Patil : मुंबईच्या दिशेने मराठ्यांचं भगवं वादळ! मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, आता पुढे काय?

गेल्या काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना आपला भाऊ मानत त्यांनी जेवणाचे निमंत्रण दिलेले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनीसुद्धा सकारात्मक उत्तर दिले होते.''संकटात असलेल्या तसेच गरिबांच्या लेकरांसाठी लढणाऱ्या आपल्या भावाला भेटालया ताईकडे साडी-चोळी घेऊन नक्कीच जाणार,''असे ते म्हणाले होते.

सध्या पाहिले तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस असून, ते मुंबई येण्यावर त्यांच्या निर्णय हा अंतिम झालेला आहे. अहिल्यानगरमधील झालेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्यावर अमृता फडणवीस यांनी या सर्व परिस्थितीवर भाष्य केले आहे. सणासुदीचे दिवस आणि सुरक्षितता या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींचा समतोल राखूनच जरांगे पाटील हे आपले आंदोलन शांततेच पूर्ण करतील, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
https://youtu.be/q-KFEicfWFU?si=o-T57X2tCJwBoPh8

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number