आधी उमेदवार जाहीर करा, मग भूमिका सांगू- राष्ट्रपतीपदाबाबत उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रपतीसाठी शिवसेनेनं 2 उमेदवारांची नावं सुचवली. मात्र, पंतप्रधान मोदीच याबाबत निर्णय घेतील. मोदी नाव जाहीर करतील, त्याला शिवसेनेनं इतर घटकपक्षांप्रमाणे पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा अमित शहांनी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली. यावर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला.   आधी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं, मग आम्ही आमची भूमिका सांगू, असं उद्धव ठाकरेंनी […]

आधी उमेदवार जाहीर करा, मग भूमिका सांगू- राष्ट्रपतीपदाबाबत उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रपतीसाठी शिवसेनेनं 2 उमेदवारांची नावं सुचवली. मात्र, पंतप्रधान मोदीच याबाबत निर्णय घेतील. मोदी नाव जाहीर करतील, त्याला शिवसेनेनं इतर घटकपक्षांप्रमाणे पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा अमित शहांनी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली. यावर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला.

 

आधी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं, मग आम्ही आमची भूमिका सांगू, असं उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना सांगितलं. शिवसेनेनं हिंदुराष्ट्र संकल्पनेसाठी सरसंघचालक मोहन भागवत आणि शेतकरी हितासाठी हरित क्रांतीचे प्रणेते स्वामिनाथन यांचं नाव सुचवलं. मात्र, अमित शाह यांनी मातोश्रीवरील बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी कुणाच्याच नावाचा प्रस्ताव शिवसेनेपुढे ठेवलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number