अमित शाह नागपुरात

राज्यात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर येणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहांचा एप्रिल महिन्यांतील हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. एकाच महिन्यात अमित शहा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. […]

अमित शाह नागपुरात

राज्यात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर येणार आहे.

दोन आठवड्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहांचा एप्रिल महिन्यांतील हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. एकाच महिन्यात अमित शहा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. गुरुवारी जामठा इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. मंगळवारी पोलीस आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंसोबत त्यांच्या जवळीकतेची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अमित शाहांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून या दौऱ्यानंतर येत्या काळात काही नवीन राजकीय घडामोडी घडणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number