अमित शहा अंबाबाईच्या दर्शनासाठी

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा दक्षिण दरवाजा दुपारी बारा ते तीन या वेळेत बंद राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आज दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पुण्याहून हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळावर येणार आहेत. अमित शहा दुपारी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. अंबाबाई मंदिर परिसरात सकाळपासूनच […]

अमित शहा अंबाबाईच्या दर्शनासाठी

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा दक्षिण दरवाजा दुपारी बारा ते तीन या वेळेत बंद राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आज दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पुण्याहून हेलिकॉप्टरने कोल्हापूर विमानतळावर येणार आहेत. अमित शहा दुपारी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. अंबाबाई मंदिर परिसरात सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. मंदिराच्या आतील सर्व दुकान सुरक्षेच्या कारणास्तव बंद केली आहे. मंदिराचा परिसर निर्मनुष्य करायला सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर परिसराची डॉग स्कॉड कडून ही तपासणी करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी (दि. १९) कोल्हापूर दौरा आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान अमित शाह कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची रणनिती आखण्यासाठी आले असल्याचे बोलले जात आहे. ते या अनुषंगाने प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चाही करणार आहेत. लोकसभेची रणनीती या बैठकीत ठरविण्यात येणार आहे. तसेच विजय संकल्प रॅलीच्या माध्यमातून ते कोल्हापुरातून भाजपच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत.

रात्री ८ वाजता भाजपच्या निवडक १५० प्रमुख पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत. ही बैठक एक तास चालणार आहे. या बैठकीतच आगामी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी भाजपची रणनीती ठरविण्यात येणार आहे. ही बैठक अटोपून शहा हे रात्री साडेनऊ वाजता विमानाने दिल्लीला प्रयाण करणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number