Bribe Case: DYSP अन् पोलिसांच्या नावाने 25 लाख मागितले; एसीबीने सापळा रचला, 5.50 लाखांचे ‘टोकन’ स्वीकारताना दोघांना पकडले

सोलापूर जिल्ह्यातील अकलुज पोलीस ठाण्यात लाचखोरीचा एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

Bribe Case: DYSP अन् पोलिसांच्या नावाने 25 लाख मागितले; एसीबीने सापळा रचला, 5.50 लाखांचे ‘टोकन’ स्वीकारताना दोघांना पकडले

Akluj Bribe case Solapur: सोलापूर जिल्ह्यातील अकलुज पोलीस ठाण्यात लाचखोरीचा एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदाराच्या भावासह इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल न करण्यासाठी, तसेच नंतर अटकपूर्व जामीन आणि पीसी अँड पीएनडीटी कायद्याची कठोर कलमे न लावण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. अकलुज उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संतोष वाळके आणि पोलीस हवालदार अनिल शिंदे यांच्या नावाने ही अवाढव्य रक्कम मागितल्याचा आरोप 37 वर्षीय परवाना सल्लागाराने (License Consultant) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) दिलेल्या तक्रारीत केला होता.

तक्रारदाराने लाच देण्याचे नाकारल्याने दाखल झाला गुन्हा; मध्यस्थांमार्फत पुन्हा तगादा
तक्रारदाराने सुरुवातीला लाच देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर अकलुज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 564/26 नोंदवण्यात आला. मात्र, त्यानंतरही लाचखोरांचा तगादा थांबला नाही. पोलीस हवालदार अनिल शिंदे यांनी खासगी इसम आबा वळकुंदे याच्या मोबाईलवरून तक्रारदाराशी संपर्क साधून 'आधीच 25 लाख रुपये दिले असते तर गुन्हा दाखल झाला नसता' असे सांगत पुन्हा पैशांची मागणी केली. या पडताळणीदरम्यान अनिल शिंदे यांच्यासाठी 25 लाख रुपये आणि खासगी मध्यस्थासाठी 5 लाख रुपये अशा एकूण 30 लाखांच्या लाचेची रचना समोर आली, ज्यातील 10 लाख रुपये देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती.

5.50 लाखांची पुढील हप्ता मागणी; एसीबीकडून पडताळणी पूर्ण
तपासाचा पुढचा टप्पा 27 ऑगस्ट रोजी पार पडला. तक्रारदाराच्या वृद्ध आई-वडिलांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच बीएनएसएस (BNSS) कलम 35(3) अन्वये नोटीस देण्यासाठी तपास अधिकारी DYSP वाळके यांच्यासाठी 5 लाख रुपये आणि पोलीस हवालदार राहुल मारुती वाघ यांच्यासाठी 50 हजार रुपये, अशी एकूण 5 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले. ही रक्कम 28 ऑगस्ट रोजी घेऊन येण्याचे आदेश आरोपींनी तक्रारदाराला दिले होते.

माळशिरस-पिलीव रोडवर एसीबीचा सापळा; दोघे रंगेहाथ जाळ्यात
पुणे युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या माहितीच्या आधारे 28 ऑगस्ट 2026 रोजी माळशिरस तालुक्यातील पालखी महामार्गावरील माळशिरस-पिलीव रोडच्या पुलाखालील जानकर प्लॉटजवळ अत्यंत गुप्ततेने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 5 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी मध्यस्थ आबा वळकुंदे आणि महादेव माने यांना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही आरोपींना 29 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता रीतसर ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा –  Hingoli: खाकी वर्दीतच PSI ने उचललं टोकाचं पाऊल! धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी; हिंगोलीत खळबळ

प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्यावर झालेली कारवाई
एसीबीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या लाचखोरीच्या रॅकेटमध्ये ४ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत:
आबा सावळा वळकुंदे (वय 48 वर्षे): खासगी वाहन चालक.
महादेव पंढरी माने (वय 39 वर्षे): खासगी इसम.
अनिल महादेव शिंदे: पोलीस हवालदार (बकल नं. 1659).
राहुल मारुती वाघ: पोलीस हवालदार (बकल नं. 1818).

एसीबीच्या पुणे युनिटकडून कारवाईचा यशस्वी धडाका
ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे युनिटच्या पथकाने पार पाडली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक निता मिसाळ आणि पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली गेली. या पथकात पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, सहायक फौजदार राजेश बाटे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण तावरे, अश्विन कुमकर, चालक पोलीस हवालदार दगडू सोनावणे आणि पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा – Jalgaon: ‘हॅपी रक्षाबंधन ताई… मम्मी-पप्पांना एकटं सोडू नकोस’ स्टेटस ठेवून भावाने रक्षाबंधनाच्या दिवशीच संपवलं जीवन, जळगाव हादरलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number