कोकणातल्या चाकरमान्यांसाठी अजित पवार सरसावले

उन्हाळा संपताच कोकणातल्या चाकरमान्यांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. एकवेळ उन्हाळ्याच्या सुट्टीत चाकरमानी गावाला जाणार नाही पण वर्षातील गणपतीच्या सुट्ट्या कोकणातला चाकरमानी वर्षाच्या सुरुवातीलाच काढून ठेवतो आणि म्हणूनच गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनीटात संपून जाते. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावीजातात या गोष्टीच्या फायदा घेत चाकरमान्यांच्या तिकिटांच्या मागणीमुळे दलालांकडून मोठ्या संख्येने रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण […]

कोकणातल्या चाकरमान्यांसाठी अजित पवार सरसावले

उन्हाळा संपताच कोकणातल्या चाकरमान्यांना वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. एकवेळ उन्हाळ्याच्या सुट्टीत चाकरमानी गावाला जाणार नाही पण वर्षातील गणपतीच्या सुट्ट्या कोकणातला चाकरमानी वर्षाच्या सुरुवातीलाच काढून ठेवतो आणि म्हणूनच गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनीटात संपून जाते.

सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावीजातात या गोष्टीच्या फायदा घेत चाकरमान्यांच्या तिकिटांच्या मागणीमुळे दलालांकडून मोठ्या संख्येने रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करुन चढ्या दराने त्याची विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वने चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राव्दारे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number