जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी म्हणून शिवसेनेनं ढोल बजाओ आंदोलन केलं. पण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला.
जळगाव जिल्हा सहकारी बँकेचंच उदाहरण त्यांनी दिलं. जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा भाजपच्या तर उपाध्यक्ष शिवसेनेच्या आमदार मग ढोल वाजवण्यात अर्थच काय असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.
शिवसेना भांबावली असल्याचा टोला त्यांनी लगावला. पण बँकांनी कर्जमाफी मिळणार असलेल्यांची यादी प्रसिद्ध करावी यासाठी ढोल आंदोलन केल्याचं शिवसेना आमदार अनिल परब यांनी स्पष्ट केलं.