जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
‘पद्मावत’ चित्रपट हा गोंधळातून सावरात-सावरता आता आणखी एक हिंदी चित्रपट हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘पद्मावत’ हा जसा राजपूतांची विरता दर्शवणारा आहे, व करणी सेनेनेचा त्याचा विरोध हा विसरण्याजोगा नाही. तसाच आता वादग्रस्त चित्रपटांच्या यादीत आणखी एका बॉलिवूडपटाचं नाव जोडलं गेलंय तो म्हणजे कंगना रनौतच्या आगामी ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’ चित्रपटातचं.
राणी लक्ष्मीबाई यांची चुकीची प्रतिमा दर्शवली जात आहेअसा आरोप करत राजस्थानमधील ब्राह्मण महासभेने चित्रपटावर आक्षेप घातला आहे. त्यामुळं हा चित्रपट अडचणीत येण्याची शक्यता आहे.
‘मणिकर्णिका’मध्ये कंगना ही राणी लक्ष्मीबाईंच्या मुख्य भूमिकेत दिसणार असून चित्रपटातील दृश्यांवर आणि त्यातील गाण्यावर आक्षेप घेत ब्राह्मण महासभेनं निर्मात्यांना पत्रही पाठवलंय. याबाबत बोलताना ब्राह्मण महासभेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मिश्रा म्हणाले की, ‘या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांचे एका इंग्रज अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचं दाखवण्यात आलंय.
चित्रपटातील काही भाग लंडनमधील लेखिका जयश्री मिश्रा यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुरामुळे या पुस्तकावर उत्तर प्रदेशात बंदी घालण्यात आली होती. मग, अशा वादग्रस्त पुस्तकाचा आधार घेऊन चित्रपट का तयार केला जातोय? तसंच, चित्रपटातील काही दृश्ये आणि गाण्यांना देखील आमचा विरोध आहे. राणी लक्ष्मीबाई या ब्राह्मण होत्या. हा ब्राह्मण समाजाच्या भावनांचा प्रश्न आहे,’ असं त्यांनी स्पष्ट केलंय.