नरेंद्र मोदी सरकार राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) आणण्याची तयारी करत आहे. त्याअंतर्गत भारतीय नागरिकांच्या बायोमेट्रिक आणि वंशावळीची नोंद केली जाणार आहे. आसाम व्यतिरिक्त देशभरात NPR वर काम सुरू करणार असल्याची माहिती भारतीय निबंधक जनरल आणि जनगणना आयुक्त विवेक जोशी यांनी दिली आहे.
हा नागरिकत्व कायदा 1955 च्या तरतुदींनुसार स्थानिक, उपजिल्हा, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तयार केला गेला आहे.
कोणताही रहिवासी, जो स्थानिक क्षेत्रात 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ राहात आहे, त्याने NPRकडे नोंदणी करणं अनिवार्य आहे.
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमध्ये तीन प्रक्रिया असणार आहेत.
पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील.
दुसरा टप्पा 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान पूर्ण होईल.
तिसऱ्या टप्प्यात, 1 ते 5 मार्च 2021 दरम्यान दुरुस्ती प्रक्रिया होईल.
प्रत्येक नागरिकाची राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमध्ये माहिती ठेवली जाईल.