Aditi Tatkare on Anganwadi Video: माता नाही तर वैरिणच! अडीच वर्षाच्या ‘त्या’ चिमुरडीला लाथ मारणारी अंगणवाडी सेविका नाही तर आईच, सत्य असं आलं समोर

त्यामुळे आपली मुलं अंगणवाडीमध्येपण असुरक्षित आहेत. अशी भावना प्रत्येक पालकाच्या मनात निर्माण झाली. अशातच आता या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Aditi Tatkare on Anganwadi Video: माता नाही तर वैरिणच! अडीच वर्षाच्या ‘त्या’ चिमुरडीला लाथ मारणारी अंगणवाडी सेविका नाही तर आईच, सत्य असं आलं समोर

सध्या सोशल मिडियावर एका अंगणवाडीमध्ये अडीच वर्षाच्या चिमुरडीला एका महिलेने लाथ घातली आणि ती मुलगी पायऱ्यांवरून खाली पडली. अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. दरम्याने सदर महिला अंगणवाडी सेविका असल्याचे म्हटले गेले. त्यामुळे आपली मुलं अंगणवाडीमध्येपण असुरक्षित आहेत. अशी भावना प्रत्येक पालकाच्या मनात निर्माण झाली. अशातच आता या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मुलीला लाथ मारणारी महिला अंगणवाडी सेविका नसून तिचीच जन्मदात्री आई असल्याचे समोर आले आहे. याबद्दलचा व्हिडीओ आदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ अपलोड करत पोस्टमध्ये लिहिले की, "पनवेलमधील व्हायरल व्हिडिओमधील महिला अंगणवाडी सेविका नाही, ती त्या मुलीची स्वतःची आई आहे".

नंतर त्यांनी लिहिले की, "सोशल मीडियावर हा व्हिडिओ "अंगणवाडी सेविकेने मारहाण केली" असा खोटा दावा करत वेगाने पसरत आहे. महिला व बालविकास विभागाने तातडीने दखल घेत संबंधित CDPO यांना प्रत्यक्ष घटनास्थळी पाठवून चौकशी केली. चौकशीत सत्य समोर आले, ती महिला अंगणवाडी सेविका नसून त्या मुलीची आईच आहे". 

पुढे त्यांनी लिहिले की, "संबंधित महिलेने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून त्यांना लहान मुलांना मारहाण करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली आहे. तसेच त्या महिलेचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे. अंगणवाडी सेविका महाराष्ट्रातील लाखो बालकांसाठी निःस्वार्थपणे झटतात. त्यांच्यावर खोट्या आरोपांचा बोजा टाकणे अन्यायकारक आहे". दरम्याने सदर मुलीच्या आईचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number