अभिनेत्री ईशा कोप्पीकर झाली आई ?

मुंबई, २४ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरने वहित्रपट सृष्टीपासून निःसंशय अंतर राखले आहे पण ती समाज माध्यमांवर खूप सक्रिय असते. ती दररोज इंस्टग्रामवर आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडी आपल्या चाहत्यांसोबत पोस्ट शेअर करत असते. अलीकडेच ईशाने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री इशा ही समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असते. आता तिने आपल्या […]

अभिनेत्री ईशा कोप्पीकर झाली आई ?

मुंबई, २४ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरने वहित्रपट सृष्टीपासून निःसंशय अंतर राखले आहे पण ती समाज माध्यमांवर खूप सक्रिय असते. ती दररोज इंस्टग्रामवर आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडी आपल्या चाहत्यांसोबत पोस्ट शेअर करत असते. अलीकडेच ईशाने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री इशा ही समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असते. आता तिने आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. ईशा आता दुसऱ्यांदा आई झाली असून तिने त्याची झलकही चाहत्यांना दाखवली आहे. आता हे पाहून बऱ्याच जणांनी ती गरोदर असल्याचे तर्क वितर्क लावले मात्र प्रत्यक्षात ती गरोदर नसून तिने तिचे गोंडस कुत्र्याचे पिल्लू तिच्या पोटात लपवले आहे. जी ती तिच्या टी-शर्टच्या आतून बाहेर काढते. ती त्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेताना दिसतेय.

 
View this post on Instagram
  A post shared by Isha Koppikar Narang (@isha_konnects)


सोनोग्राफीचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना ईशा गरोदर असल्याचा विचार येत आहेत. तर ते तिच्या कुत्र्याच्या पिल्लूचे सोनोग्राफीचे फोटो आहेत. याबाबत तिने समाज माध्यमांवर एक खास पोस्ट केली आहे. यात ईशाची मुलगीही तिच्यासोबत खेळताना दिसत आहे. पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये – “मी तुम्हा सर्वांपासून गुड न्यूज लपवून ठेवत होते. पण मला ते फार काळ लपवता आले नाही” असे लिहिले आहे.

या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी बऱ्याच कंमेंट्स केल्या आहेत. काहीजण तिचे अभिनंदन करत आहेत. तर काहींनी मिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number