या अभिनेत्याने केलं महिलांसंदर्भात ‘इतकं’ भीषण विधान!

केरळमधील शबरीमाला या अय्यप्पा स्वामी मंदिरातील महिला प्रवेशबंदी सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यावर अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, तर अनेकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते कोल्लम तुलसी यांनी तर धक्कादायक विधान केलंय. ते कोलाम येथे एका कार्यक्रमात बोलत होते. शबरीमाला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करायला हवेत. एक तुकडा दिल्लीला पाठवा आणि एक […]

या अभिनेत्याने केलं महिलांसंदर्भात ‘इतकं’ भीषण विधान!

केरळमधील शबरीमाला या अय्यप्पा स्वामी मंदिरातील महिला प्रवेशबंदी सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यावर अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, तर अनेकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते कोल्लम तुलसी यांनी तर धक्कादायक विधान केलंय. ते कोलाम येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

शबरीमाला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करायला हवेत. एक तुकडा दिल्लीला पाठवा आणि एक तिरुअनंतपुरममध्ये मुख्यमंत्र्यांकडे पाठवा, असं धक्कादायक विधान कोल्लम तुलसी यांनी केलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

शबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्षंमधील वयाच्या महिलांना अनेक शतकांपासून प्रवेश वर्ज्य आहे. महिलांना मंदिरात असणाऱ्या प्रवेशबंदी विरोधात सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबर रोजी निर्णय दिला आहे. 18 ऑक्टोबरपासून महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number