मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही अनिल परब यांना तुरूंगात जावेच लागेल, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या रत्नागिरीत दाखल झाले असून त्यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान, अनिल परब यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे सोमय्या म्हणाले.
महाराष्ट्र कॉन्सिट्यूसन बोर्डाने अनिल परब यांचा रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता हे रिसॉर्ट पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर आहे. तसेच न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस दिली असल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले.
परिवहन मंत्री अनिल परब गुन्हेगार आहेत. त्यामुळे त्यांोचा रिसॉर् तोडला पाहिजे तसेच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे किरीट सोमय्या म्हणाले. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे. मात्र, ठाकरे सरकार कारवाई का करत नाही? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.