Mumbai Schools: गणेशोत्सवाची सुट्टी नाकारणाऱ्या मुंबईतील गुजराती, कॉन्व्हेंट शाळांवर कारवाईचा बडगा; शिक्षण विभाग घेणार कडक भूमिका

संबंधित शाळांनी नेमक्या कोणत्या कारणास्तव ही सुट्टी नाकारली आहे, याची कसून पडताळणी आता केली जाणार आहे.

Mumbai Schools: गणेशोत्सवाची सुट्टी नाकारणाऱ्या मुंबईतील गुजराती, कॉन्व्हेंट शाळांवर कारवाईचा बडगा; शिक्षण विभाग घेणार कडक भूमिका

Ganeshotsav School Holiday: गणेशोत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांना कुटुंबियांसोबत सण साजरा करता यावा यासाठी शालेय शिक्षण विभागाने आठवडाभराची सुट्टी जाहीर केली आहे. परंतु, मुंबईतील काही शाळांनी या शासकीय निर्णयाची अंमलबजावणी न करता नियमित वर्ग सुरू ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने विलेपार्ले, कांदिवली आणि घाटकोपर या भागांतील गुजराती अल्पसंख्याक संस्था, कॉन्व्हेंट आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (International Boards) जोडलेल्या शाळांचा समावेश आहे.

शिक्षण विभागाकडे तक्रारी दाखल; चौकशीचे तात्काळ आदेश
राज्यात विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकण क्षेत्रात गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. स्थानिक संस्कृती आणि सणाचा विचार करून शासनाने जाहीर केलेली सुट्टी देण्यास काही संस्थांनी उघडपणे नकार दिल्याने पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रकाराच्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर मुंबई महापालिकेचा शिक्षण विभाग आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

हेही वाचा – Nalasopara Ganpati Aagman Incident: गणेश आगमनावेळी मूर्ती कोसळल्याची आणखी एक घटना! 4-5 जण मूर्तीखाली….; अंगावर काटा आणणारा थरारक Video समोर

सुट्टी नाकारण्याचे कारण काय? पडताळणी सुरू
संबंधित शाळांनी नेमक्या कोणत्या कारणास्तव ही सुट्टी नाकारली आहे, याची कसून पडताळणी आता केली जाणार आहे. या शाळांना त्यांच्या बोर्डाकडून किंवा व्यवस्थापनाकडून अशा प्रकारे वर्ग सुरू ठेवण्याची काही विशेष परवानगी मिळाली आहे का, तसेच त्यांनी शासनाच्या अधिकृत नियमांचे उल्लंघन केले आहे का, या सर्व बाबींची सखोल तपासणी केली जाईल.

नियमांचे उल्लंघन आढळल्यास कडक कारवाईचा इशारा
शासकीय निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या आणि गणेशोत्सवाची सुट्टी न देणाऱ्या शाळांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडून गोळा केली जात आहे. चौकशीदरम्यान नियमांचा भंग झाल्याचे सिद्ध झाल्यास अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून प्रशासकीय व कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा – Sweets Price Hike : महागाईमुळे गणेश भक्तांचे बजेट कोलमडणार, पाहा मोदक-पेढे किती रुपयांनी महागले?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number