Abhijit Dipke: अभिजीत दीपकेंची प्रकृती बिघडली, टायफॉईड असल्याचा व्हिडीओ पोस्ट; तरीही आंदोलनावर ठाम

व्हिडिओ संदेशातून दीपके यांनी आपल्या प्रकृतीबाबत माहिती देताना आंदोलनाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली.

Abhijit Dipke: अभिजीत दीपकेंची प्रकृती बिघडली, टायफॉईड असल्याचा व्हिडीओ पोस्ट; तरीही आंदोलनावर ठाम

NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांची प्रकृती बिघडली असून त्यांना टायफॉइडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असूनही आंदोलनात सक्रिय राहिलेल्या दीपके यांनी स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात अभिजीत दीपके सातत्याने उपस्थित राहून नेतृत्व करत आहेत. मात्र, सततचा ताण, अपुरी विश्रांती आणि धावपळीमुळे त्यांची तब्येत खालावल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना टायफॉइडचे निदान झाल्याने सध्या त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत.

व्हिडिओ संदेशातून दीपके यांनी आपल्या प्रकृतीबाबत माहिती देताना आंदोलनाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू असले तरी विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात कोणतीही माघार घेतली जाणार नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांसह विविध संघटना आणि राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. NEET पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number