पंजाबमध्ये प्राथमिक मतमोजणीत ‘आप’ची आघाडी

देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांची विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडत आहे. दरम्यान, पंजाबमध्ये प्राथमिक मतमोजणीमध्ये आप पक्षाला बहुमत मिळाले आहे. पंजाबमधील ११७ जागांमधील ९० जागांवर आपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आप पक्ष अग्रेसर असून काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. पंजाबमध्ये २२ जिल्ह्यांमधील ११७ जागांवर २० फेब्रुवारी रोजी मतदान […]

पंजाबमध्ये प्राथमिक मतमोजणीत ‘आप’ची आघाडी

देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांची विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडत आहे. दरम्यान, पंजाबमध्ये प्राथमिक मतमोजणीमध्ये आप पक्षाला बहुमत मिळाले आहे. पंजाबमधील ११७ जागांमधील ९० जागांवर आपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आप पक्ष अग्रेसर असून काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे.

पंजाबमध्ये २२ जिल्ह्यांमधील ११७ जागांवर २० फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. तर आज विधानसभा निवडणुकीची मतमोजणी असून प्राथमिक टप्प्यातच आप पक्षाने आघाडी मारली आहे. तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी पाहायला मिळत आहेत. काँग्रेसने १५ जागांवर खाते उघडले असून अकाली दल ८ जागांवर आघाडी मिळाली आहे. तसेच भाजपने ४ जागांवर आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

पंजापमध्ये आप पक्षाने जोरदार आघाडी घेतली असून अमरिंदर सिंग आणि प्रकाशसिंह बादल पिछाडीवर गेले असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच काँग्रेसचा महत्वाचा चेहरा असलेले नवज्योतसिंग सिद्धू हेदेखील पिछाडीवर आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number