नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे एक भीषण अपघात होता होता राहिला आहे. भरधाव वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सात ते आठ दुचाकीला उडविल्याची घटना नाशिकच्या मनमाडमध्ये घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या भीषण अपघातात अनेक दुचाकींचे नुकसान झाले आहे तर कोणालाही गंभीर दुखापत न झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मनमाडच्या महर्षी वाल्मिकी स्टेडियम गाड्यासमोर खाद्यपदार्थ घेण्यासाठी दुचाकी लावलेल्या होत्या. त्यावेळी हा अपघाता झाला असल्याची प्रथमिक माहिती आहे. वाहन चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर मोठी गर्दी जमली होती. अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच पुढचा तपास करत आहेत.