दौंडमध्ये झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एका माथेफीरूकडून झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाल्याची घडना समोर आली आहे. बोरावडेनगर, नगर चौकी भागात गोळीबाराची ही घटना घडली. विशेष म्हणजे, एकाच व्यक्तीकडून दोन ठिकाणी हा गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारानंतर दौंडमधे तणावाच वातावरण वाढलं आहे. त्यामुळे दौंडमध्ये पोलीसांचा कडक बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. अमोल जाधव, […]

दौंडमध्ये झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एका माथेफीरूकडून झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाल्याची घडना समोर आली आहे. बोरावडेनगर, नगर चौकी भागात गोळीबाराची ही घटना घडली.

विशेष म्हणजे, एकाच व्यक्तीकडून दोन ठिकाणी हा गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारानंतर दौंडमधे तणावाच वातावरण वाढलं आहे. त्यामुळे दौंडमध्ये पोलीसांचा कडक बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

अमोल जाधव, गोपाळ शिंदे आणि अनिल जाधव या तिघांचा गोळीबारात मृत्यू झालाय. गोळीबार करुन संजय शिंदे घरी जाऊन लपून बसला. नंतर थोड्यावेळाने तो तेथून पसार झाला असून त्याच्या घराबाहेर मोठा जमाव जमला.

संजय शिंदे हा एसआरपीचा जवान असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा गोळीबार का करण्यात आला याची माहिती अद्यापही समोर आली नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number