मसाज सेवेने वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांमध्ये भरले चैतन्य

दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढरीकडे प्रस्थान ठेवले. पुणे ते सासवड हा लांबचा टप्पा पार करताना अवघड अशी दिवेघाटाची वाट चढून आल्यावर दमलेल्या पायांना योग साधकांकडून तिळाच्या तेलाने मसाज केला जातो. या आगळ्यावेगळ्या सेवेने वारकरी सुखावतात आणि उत्साहाने पुढे मार्गस्थ होतात. योग विद्याधाम पिंपरी चिंचवड येथील योगसाधकांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने हा मसाज […]

मसाज सेवेने वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांमध्ये भरले चैतन्य

दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पंढरीकडे प्रस्थान ठेवले. पुणे ते सासवड हा लांबचा टप्पा पार करताना अवघड अशी दिवेघाटाची वाट चढून आल्यावर दमलेल्या पायांना योग साधकांकडून तिळाच्या तेलाने मसाज केला जातो. या आगळ्यावेगळ्या सेवेने वारकरी सुखावतात आणि उत्साहाने पुढे मार्गस्थ होतात. योग विद्याधाम पिंपरी चिंचवड येथील योगसाधकांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने हा मसाज करुन दिला. एकावेळी साधारण ५० महिला आणि ५० पुरुष वारकऱ्यांच्या पायांचा मसाज होतो. यंदा या वारीत सहा ते सात हजार वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगगुरू प्रमोद निफाडकर आणि निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुरेश केकाने, ऐश्वर्या जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारकरी मसाज सेवा ९ वर्षांपासून सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number