Nagpur Crime News : दारूड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेनं घेतला घटस्फोट; पतीने संतापून भररस्त्यात पत्नीवर केले सपासप वार, आरोपी फरार

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी परिसरात पतीने पत्नीची भररस्त्यात चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. मात्र पतीच्या जाचाला कंटाळून महिलेनं घटस्फोटासाठी अर्ज केला होता. वर्धा येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी 24 वर्षीय विवाहितेची भररस्त्यात चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. शुक्रवारी […]

Nagpur Crime News : दारूड्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेनं घेतला घटस्फोट; पतीने संतापून भररस्त्यात पत्नीवर केले सपासप वार, आरोपी फरार

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी परिसरात पतीने पत्नीची भररस्त्यात चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. मात्र पतीच्या जाचाला कंटाळून महिलेनं घटस्फोटासाठी अर्ज केला होता. वर्धा येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी 24 वर्षीय विवाहितेची भररस्त्यात चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. शुक्रवारी सायंकाळी जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्लीत ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत महिलेच्या वडिलांनी जावयावरच हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मंजू संदीप पचारे (24, मूळ रा. पाचखेड, ता. पुलगाव, जि. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी मंजूचा विवाह संदीप रामू पचारे याच्याशी झाला होता. मात्र संदीप हा दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करीत असल्याने मंजूने त्याचे घर सोडले. ती तिच्या माहेरी राहू लागली. मंजूने पती संदीप रामू पचारे याच्याविरोधात वर्धा येथील न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल 25 जून 2026 रोजी लागला. शुक्रवारी सायंकाळी मंजू शेतातून काम करून घरी आल्यानंतर पुन्हा वडिलांसाठी पाण्याची बाटली घेऊन शुक्रवार बाजारातील दुकानाकडे निघाली होती. त्याचवेळी आरोपीने तिच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

हेही वाचा : Ketan Agarwal Murder Case Update: होणाऱ्या पतीला लोहगड कड्यावरून ढकलून देणाऱ्या सियाचा पोलीस कोठडीत माज; पश्चाताप तर लांबच, केली ही मागणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number