Mumbai Auto Rickshaw Fare Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! 1 सप्टेंबरपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार?

ही नवीन दरवाढ येत्या 1 सप्टेंबरपासून सर्वत्र लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mumbai Auto Rickshaw Fare Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! 1 सप्टेंबरपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार?

Mumbai Auto Rickshaw Fare Hike: मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) दररोज ऑटो रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणाऱ्या लाखो नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांवर लवकरच अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) रिक्षा आणि पारंपरिक 'काळ्या-पिवळ्या' टॅक्सींच्या भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली आहे. ही नवीन दरवाढ येत्या 1 सप्टेंबरपासून सर्वत्र लागू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तथापि, राज्य शासनाकडून यासंदर्भातील अंतिम अधिकृत अधिसूचना जारी होईपर्यंत प्रवाशांना सध्याच्या जुन्या दरांनुसारच प्रवासाचे भाडे मोजावे लागणार आहे.

रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात नेमकी किती वाढ?
MMRTA कडून मंजूर करण्यात आलेल्या नव्या दररचनेनुसार, ऑटो रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयाची, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात 2 रुपयांची थेट वाढ करण्यात आली आहे. या नवीन रचनेनुसार, आता ऑटो रिक्षासाठी पहिल्या 1.5 किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांना 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे, काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे पहिल्या 1.5 किलोमीटरचे किमान भाडे 31 रुपयावरून थेट 33 रुपये करण्यात आले आहे. किमान 1.5 किलोमीटरच्या पुढील प्रवासासाठी लागणाऱ्या प्रति-किलोमीटरच्या दरातही याच प्रमाणात वाढ लागू केली जाणार आहे.

सीएनजी अन् वाहनांच्या देखभालीतील वाढीमुळे भाडेवाढीचा निर्णय
गेल्या काही वर्षांत सीएनजी (CNG) इंधनाचे गगनाला भिडलेले दर, वाहनांचे सुटे भाग (Spare Parts) आणि दैनंदिन दुरुस्ती व देखभालीच्या खर्चात झालेली प्रचंड वाढ यामुळे रिक्षा-टॅक्सी चालकांचे आर्थिक गणित पुरते कोलमडले होते. विविध परिवहन संघटनांकडून वाढत्या महागाईच्या तुलनेत योग्य भाडेवाढ मिळावी यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. वाढत्या परिचालन खर्चामुळे चालकांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले होते; त्यामुळे प्राधिकरणाने सर्व घटकांचा सखोल आढावा घेऊन ही दरवाढ मंजूर केली आहे.

हेही वाचा – Pune: निकृष्ट पोषण आहार दाखवला म्हणून निलंबन! देवयानी पारधींना अखेर मोठा दिलासा; निलंबनाची कारवाई मागे

पुण्यातही प्रवास होणार महाग
रेल्वे स्थानकांपासून आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर 'शेअर्ड' (सामायिक) रिक्षा किंवा टॅक्सीचा पर्याय निवडतो. प्राप्त अहवालानुसार, या शेअर्ड प्रवासाच्या दरांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे, मात्र यावर MMRTA कडून अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, 1 सप्टेंबरपासून केवळ मुंबईतच नव्हे तर पुण्यातही रिक्षा प्रवास महागणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरीनुसार प्रवाशांना आता पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 25 ऐवजी 30 रुपये, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 17 ऐवजी 20 रुपये मोजावे लागणार आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number