संजय राऊतांवर बार्शीत गुन्हा दाखल

उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आक्षेपार्ह फोटो ट्वीट केल्यामुळे राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला. राऊतांनी हा फोटो ट्वीट केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांवर टीका करत कारवाईची मागणी केली होती. अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर केल्याप्रकरणी सोलापूरमधील बार्शीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊतांनी पीडित मुलीचा रक्तबंबाळ […]

संजय राऊतांवर बार्शीत गुन्हा दाखल

उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आक्षेपार्ह फोटो ट्वीट केल्यामुळे राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला. राऊतांनी हा फोटो ट्वीट केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांवर टीका करत कारवाईची मागणी केली होती.

अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर केल्याप्रकरणी सोलापूरमधील बार्शीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊतांनी पीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतला फोटो ट्वीट केला होता. त्यामुळे राऊतांवर पॉक्सो कलम 23, ज्युवेनाईल जस्टिस कलम 74 आणि IPC 228 A नुसार बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊतांनी ट्विट केले होते की, देवेंद्रजी. हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.

https://twitter.com/rautsanjay61/status/1637020928587735040?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1637020928587735040%7Ctwgr%5Ebcd19270903754ae23cac1dde74a5a38ab4af5d3%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fsanjay-raut-shivsena-mp-tweeted-photo-of-injured-and-raped-girl-in-barshi-solapur-vsk98

याप्रकरणी, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्हिडिओ ट्विट करत संजय राऊतांनी व्हायरल केलेल्या फोटोबद्दल आक्षेप घेतला होता. तर, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच महिला आयोगालाही कारवाई करण्याची मागणी केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number