तिसऱ्या टप्प्यात राज्यात 61.30 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 61.30 टक्के मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना झाली नसून मतदान शांततेत पार पडले. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान झाले आहे.14 मतदार संघात […]

तिसऱ्या टप्प्यात राज्यात 61.30 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 61.30 टक्के मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना झाली नसून मतदान शांततेत पार पडले. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान झाले आहे.14 मतदार संघात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार होते. त्यापैकी 1 कोटी 33 लाख 19 हजार पुरुष तर 1 कोटी 24 लाख 70 हजार महिला मतदार आणि 652 तृतीय पंथी मतदार होते.

तिसऱ्या टप्प्यात  61.30 टक्के मतदान

जळगाव 58.00 टक्के,

रावेर 58.00 टक्के,

जालना 63.00 टक्के,

औरंगाबाद 61.87 टक्के,

रायगड 58.06 टक्के,

पुणे 53.00 टक्के,

बारामती 59.50 टक्के,

अहमदनगर 63.00 टक्के,

माढा 63.00 टक्के, सांगली 64.00 टक्के,

सातारा 57.06 टक्के,

रत्नागिरी-सिंधुदुर्ग 62.26 टक्के,

कोल्हापूर 69.00 टक्के,

हातकणंगले 68.50 टक्के

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number