अन् लग्नाच्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला

वृत्तसंस्था, गुजरात गुजरातमधील भावनगरजवळ ट्रक पलटून भीषण अपघातात झालाय. या भीषण दुर्घटनेत 30 जण मृत्युमुखी पडलेत. तर अनेक जण जखमी झालेत. धक्कादायक बाब म्हणजे लग्नासाठी वऱ्हाड निघालं होतं. आणि या ट्रकमध्ये तब्बल 70 वऱ्हाडी प्रवास करत होते. पहाटे भावनगर-राजकोट महामार्गावर रनघोलाजवळ ही दुर्घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक थेट नाल्यात कोसळला. या अपघातात जखमी झालेल्यांना […]

अन् लग्नाच्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला

वृत्तसंस्था, गुजरात

गुजरातमधील भावनगरजवळ ट्रक पलटून भीषण अपघातात झालाय. या भीषण दुर्घटनेत 30 जण मृत्युमुखी पडलेत. तर अनेक जण जखमी झालेत. धक्कादायक बाब म्हणजे लग्नासाठी वऱ्हाड निघालं होतं. आणि या ट्रकमध्ये तब्बल 70 वऱ्हाडी प्रवास करत होते. पहाटे भावनगर-राजकोट महामार्गावर रनघोलाजवळ ही दुर्घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक थेट नाल्यात कोसळला. या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चालकाला डुलकी लागल्याने, त्याने ट्रकवरील नियंत्रण गमावल्याचं सांगण्यात येत आहे.

gujrat-truck2.png

दरम्यान, मृतांमध्ये अनेक महिला आणि मुलांचाही समावेश आहे. तसेच अनेक जखमींची स्थितीही चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर तिथेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केलाय. यावेळी पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती सहानुभूती व्यक्त केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number