Constitution Day 2025 : 26 नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' आणि 'राष्ट्रीय कायदा दिन' म्हणून संपुर्ण देशभरात साजरा केला जातो. मात्र 26 नोव्हेंबरलाच संविधान दिवस का साजरा केला जातो? त्यामगचं कारण जाणून घ्या...

Constitution Day 2025 : 26 नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ साजरा करण्यामागचं कारण काय? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' आणि 'राष्ट्रीय कायदा दिन' म्हणून संपुर्ण देशभरात साजरा केला जातो. मात्र 26 नोव्हेंबरलाच संविधान दिवस का साजरा केला जातो? त्यामगचं कारण असं की, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला होता. त्यानंतर अनेक चर्चा आणि विचारमंथनानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशभरात भारतीय संविधान लागू करण्यात आले.

संविधानाने भारताला एक मजबूत लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली. संविधान दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये भाषणे, निबंध लेखन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संविधान दिनाचे मुख्य उद्देश म्हणजे, देशातील प्रत्येक नागरिकाला घटनात्मक मूल्यांचे ज्ञान व्हावे, संविधानाचे महत्त्व आणि त्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. 

भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान मानले जाते. संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 च्या सुरुवातीला  भारतीय राज्यघटनेचा मसुदा पूर्ण करुन तो संविधान सभेत मांडला. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी हा मसुदा फार कमी सुधारणांसह स्वीकारण्यात आला होता.

26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. त्यानंतर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी संविधान दिवस साजरा करण्यास मंजुरी दिली. संविधानात अनेक देशांच्या संविधानांचा स्वीकार करण्यात आला असल्यामुळे संविधानाला 'कर्जाची पिशवी' असेही म्हणतात.

भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये, सरकारची भूमिका, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार यांचाही उल्लेख आहे. त्याचसोबत संविधानाने भारतीय नागरिकांना समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, संवैधानिक उपचारांचा अधिकार इत्यादी महत्त्वाचे मूलभूत अधिकार दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number