जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
व्हॅलेंटाईन डेला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यानी यंदा औरंगाबादमध्ये अनोख्या पध्दतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केलाय.
शिवसेनेच्या वतीने औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच 309 माता-पित्यांचे पूजन आयोजित करण्यात आले.
व्हॅलेंटाईन डे सारखी निमित्त शोधून प्रेयसीवर प्रेम करण्यापेक्षा दररोज आई-वडिलांवर प्रेम करण्याचा सल्ला यानिमित्ताने शिवसेनेने आजच्या तरुणपिढीला दिलाय.
वृध्दाश्रम हे भारतीय संस्कृतीसाठी लागलेला कलंक पुसण्यासाठी शिवसेनेतर्फे माता-पित्यांचे पूजन हा कार्यक्रम आयोजित केला होता.