‘काँग्रेस येणार, संपत्ती लुटणार’

नवी दिल्ली, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस येणार, संपत्ती लुटणार… माणूस जीवंत असतानाही आणि माणसाच्या मृत्यूनंतरही काँग्रेस त्याची संपत्ती लुटत राहणार… असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते छत्तीसगडमधील एका प्रचारसभेत बोलत होते. परदेशातील काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर मोदींनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुसलमानांना महत्त्व आहे. काँग्रेसचे लक्ष देशातील बहुसंख्यांकांच्या […]

‘काँग्रेस येणार, संपत्ती लुटणार’

नवी दिल्ली, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस येणार, संपत्ती लुटणार… माणूस जीवंत असतानाही आणि माणसाच्या मृत्यूनंतरही काँग्रेस त्याची संपत्ती लुटत राहणार… असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते छत्तीसगडमधील एका प्रचारसभेत बोलत होते. परदेशातील काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर मोदींनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुसलमानांना महत्त्व आहे. काँग्रेसचे लक्ष देशातील बहुसंख्यांकांच्या संपत्तीवर आहे. सत्तेत आल्यावर काँग्रेस बहुसंख्यांकांची संपत्ती ताब्यात घेऊन तिचे स्वतःच्या मर्जीने वाटप करण्याच्या विचारात आहे. काँग्रेसच्या या योजनेमुळे अनेक सामान्य नागरिक त्यांची हक्काची संपत्ती गमावणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

अमेरिकेत माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या एकूण संपत्तीपैकी ५५ टक्के संपत्ती सरकार जप्त करते आणि उरलेल्या ४५ टक्के संपत्तीचे हक्क वारसदारांना मिळतात, असे सॅम पित्रोदा म्हणाले. पित्रोदांनी भारतात अमेरिकेतील कायद्यासारखा कायदा व्हायला हवा अशा स्वरुपाचे वक्तव्य केले. पित्रोदांची ही मुलाखत प्रसिद्ध होताच मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. सॅम पित्रोदांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरताच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सारवासारव सुरू केली. त्यांनी पित्रोदांच्या वक्तव्याची जबाबदारी झटकली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number