अकोला, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अकोला लोकसभा मतदार संघातील १६ हजार ४८८ मतदार हे वयोवृद्ध असून १२ हजार ४५ मतदार हे दिव्यांग आहेत. जे मतदार दिव्यांग किंवा ८५ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील आहेत आणि जे मतदार मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकत नाहीत, अशा मतदारांना टपाल मतपत्रिकेची आणि घरी मतदानाची सुविधा निवडणूक विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. गृह मतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित करण्यात आले असून स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहे. या सुविधेमुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे.