सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केजरीवालांना धक्का

नवी दिल्ली, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीने अटक केलेले अरविंद केजरीवाल सध्या न्यायालयीन कोठडीत तिहारच्या तुरुंगात आहेत. केजरीवालांना २४ तासांत तीन धक्के बसले आहेत. दिल्लीच्या उच्च न्यायालयाने मंगळवारी केजरीवालांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली. बुधवारी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. या याचिकेवर तातडीने सुनावणी अशक्य असल्याचे […]

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केजरीवालांना धक्का

नवी दिल्ली, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीने अटक केलेले अरविंद केजरीवाल सध्या न्यायालयीन कोठडीत तिहारच्या तुरुंगात आहेत. केजरीवालांना २४ तासांत तीन धक्के बसले आहेत. दिल्लीच्या उच्च न्यायालयाने मंगळवारी केजरीवालांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळली. बुधवारी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. या याचिकेवर तातडीने सुनावणी अशक्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सुनावणी पुढल्या आठवड्यात होऊ शकते, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

न्यायालयीन कोठडीत असताना आठवड्यातून पाच वेळा वकिलांना भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका केजरीवाल यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केली होती. ही याचिका न्यायदंडाधिकाऱ्यांनी बुधवारी फेटाळली. सध्या केजरीवाल आठवड्यातून दोन वेळा वकिलांना भेटू शकतात. त्यांची पाच वेळा वकिलांना भेटण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे.

केजरीवाल समर्थकाला दणका

अरविंद केजरीवाल यांचे समर्थक असलेल्या आपच्या संदीप कुमार यांनी केजरीवालांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. तसेच याचिकाकर्त्याला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. केजरीवाल यांना झालेली अटक कायद्यानुसार वैध आहे. पण विशिष्ट हेतूने वैध असलेल्या कारवाई विरोधात दाद मागून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी याचिकाकर्त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.

केजरीवालांना न्यायालयाकडून चोवीस तासांत तीन धक्के
१. केजरीवालांना झालेली अटक वैध – दिल्ली उच्च न्यायालय (मंगळवार ९ एप्रिल २०२४, दुपारी)
२. न्यायालयीन कोठडीत पाच वेळा वकिलांना भेटण्याची मागणी फेटाळली, न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय (बुधवार, १० एप्रिल २०२४, सकाळी)
३. अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी अशक्य – सर्वोच्च न्यायालय (बुधवार, १० एप्रिल २०२४, दुपारी)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number