भंडारा, १० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला मागून ट्रकने धडक दिली. भंडारा लोकसभा मतदारसंघात एक प्रचारसभा घेतल्यानंतर नाना परतत होते, त्यावेळी हा अपघात झाला. अपघातात नाना पटोलेंच्या गाडीच्या मागील भागाचे नुकसान झाले. पण नाना पटोले सुखरुप आहेत. या घटनेनंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोप राजकीय विरोधकांनी घडवून आणल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
नाना पटोलेंच्या गाडीला भंडारा जिल्ह्यातील भीलवाडा गावाजवळ अपघात झाला. या प्रकरणात प्राथमिक माहिती घेऊन पोलिसांनी अपघाताची नोंद केली आणि तपास सुरू केला आहे.