मनसेचा गुढी पाडवा मेळावा

मुंबई, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मनसे प्रमुख राज ठाकरे गुढी पाडव्याचे औचित्य साधून मुंबईत शिवाजी पार्क येथे मेळावा घेणार आहेत. या सभेसाठी मनसेचे कार्यकर्ते सभास्थळी गोळा होऊ लागले आहेत. पाडवा मेळाव्यात राज ठाकरे पक्षाची लोकसभा निवडणुकीतील राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे काय बोलण्याची शक्यता ? लोकसभेसाठी भूमिका स्पष्ट करणार महायुतीत सामील […]

मनसेचा गुढी पाडवा मेळावा

मुंबई, ९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मनसे प्रमुख राज ठाकरे गुढी पाडव्याचे औचित्य साधून मुंबईत शिवाजी पार्क येथे मेळावा घेणार आहेत. या सभेसाठी मनसेचे कार्यकर्ते सभास्थळी गोळा होऊ लागले आहेत. पाडवा मेळाव्यात राज ठाकरे पक्षाची लोकसभा निवडणुकीतील राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे काय बोलण्याची शक्यता ?

लोकसभेसाठी भूमिका स्पष्ट करणार

महायुतीत सामील झाल्याची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक

मोदी विरोधकांवर टीका

उद्धव यांच्यावर शरसंधान

महत्त्वाचे मुद्दे

१. जय महाराष्ट्रला दिलेल्या विशेष मुलाखतीत राज यांनी शिवसेनेत यावं असं आवाहन काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहे..या मुद्द्यावर गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे काही भूमिका घेतात का ते पहाणं लक्षवेधी ठरणार आहे….

२. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसैनिक शिवाजी पार्कात जमू लागले आहेत. राज ठाकरेंनी पुन्हा शिवसेनेत जावं का? यावर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number