केजरीवालांना न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली, १ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी केजरीवालांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. केजरीवालांच्या कोठडीबाबत सुनावणी झाली त्यावेळी त्यांची पत्नी सुनिता केजरीवाल आणि आपचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांना ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याच्या माध्यमातून […]

केजरीवालांना न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली, १ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी केजरीवालांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. केजरीवालांच्या कोठडीबाबत सुनावणी झाली त्यावेळी त्यांची पत्नी सुनिता केजरीवाल आणि आपचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांना ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी २१ मार्च रोजी अटक केली. अटक झाल्यापासून ईडी कोठडीत असलेल्या केजरीवालांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

केजरीवालांनी नाही सांगितला पासवर्ड

ईडी कोठडीत असताना वारंवार विचारूनही अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मोबाईलचा पासवर्ड सांगितलेला नाही. ईडी तपासाचा भाग म्हणून अरविंद केजरीवाल आणि त्यांची पत्नी सुनिता केजरीवाल या दोघांचे मोबाईल जप्त केले आहेत. सुनिता केजरीवाल यांच्या मोबाईलचा पासवर्ड ईडीला मिळाला आहे. पण केजरीवाल यांनी स्वतःच्या मोबाईलचा पासवर्ड सांगणे टाळले आहे.

आपचे नेते तुरुंगात

दिल्ली दारू घोटाळ्याच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंह हे तिघे तुरुंगात आहेत. या व्यतिरिक्त भारत राष्ट्र समितीच्या के. कविता यांचीही रवानगी तुरुंगात झाली आहे. सिसोदिया आणि संजय सिंह मागील अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

आतिशी आणि सौरभ भारद्वाज अडचणीत ?

केजरीवाल यांनी ईडीच्या प्रश्नांना उत्तरं देताना आतिशी आणि सौरभ भारद्वाज या दोघांची नावं घेतल्याची माहिती ईडीच्या वकिलाने दिली. केजरीवालांना अटक झाल्यानंतर आपमध्ये तसेच दिल्ली सरकारमध्ये आतिशी आणि सौरभचे महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली होती. पण लवकरच या दोघांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number