नागपूर, २६ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘अकोला पश्चिम’ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द केली आहे. निवडणूक आयोगाने ‘अकोला पश्चिम’ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली होती. या पोटनिवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार होते. पण उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ही निवडणूक रद्द झाली आहे.
भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या ‘अकोला पश्चिम’ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. या पोटनिवडणुकीला अकोल्यातील नागरिकाने आव्हान दिले होते. फक्त तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय का करता ?, असा प्रश्न याचिकाकर्त्याने उपस्थित केला होता. या प्रश्नाची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘अकोला पश्चिम’ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द केली.