मुंबई, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : उद्धव आणि दाऊद दोघेही कोकणात जन्मले, या शब्दात भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. याआधी शिउबाठाचे नेते संजय राऊत यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातमधील ज्या गावात झाला त्या गावाजवळच औरंगजेबाचा जन्म झाला; असे संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या वक्तव्याला भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिले. चित्रा वाघ यांनी उद्धव यांची तुलना दाऊद इब्राहिमशी केली.