‘मोदी नाही, औरंगजेब म्हणा’

बुलढाणा, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : मोदी नाही, औरंगजेब म्हणा; असे शिउबाठाचे नेते संजय राऊत म्हणाले. ते बुलढाणा येथील पक्षाच्या सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातमधील ज्या गावात झाला त्या गावाजवळच औरंगजेबाचा जन्म झाला. याच कारणामुळे मोदी औरंगजेबासारखा विचार करतात; असेही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत हे प्रसिद्धीसाठी वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. […]

‘मोदी नाही, औरंगजेब म्हणा’

बुलढाणा, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : मोदी नाही, औरंगजेब म्हणा; असे शिउबाठाचे नेते संजय राऊत म्हणाले. ते बुलढाणा येथील पक्षाच्या सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातमधील ज्या गावात झाला त्या गावाजवळच औरंगजेबाचा जन्म झाला. याच कारणामुळे मोदी औरंगजेबासारखा विचार करतात; असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत हे प्रसिद्धीसाठी वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आता ते मोदींविषयी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. संजय राऊत यांनी मोदींविषयीचे वक्तव्य केले त्यावेळी मंचावर उद्धव उपस्थित होते.

भाजपा आणि उद्धव यांच्या पक्षाने फारकत घेतली आहे. आता राज ठाकरे भाजपाच्या संपर्कात आहेत. राज यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर तर उद्धव आणि संजय राऊत यांच्याकडून मोदी आणि भाजपावरील टीकेच प्रमाण वाढले आहे. यात आता संजय राऊत यांच्या ताज्या वक्तव्याची भर पडली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number