बिहार, दि. १५ मार्च, २०२४ – नितीश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सुरू झाला आहे. एकापाठोपाठ २१ मंत्री शपथ घेत आहेत. ज्यामध्ये ६ नवीन चेहरे आहेत. भाजपकडून १२ आणि जेडीयूकडून ९ नवीन मंत्री केले जात आहेत. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. सिद्धार्थ राजभवनात पोहोचले आणि त्यांनी संभाव्य मंत्र्यांची यादी राज्यपालांना सुपूर्द केली.
भाजपकडून मंगल पांडे, नितीन नवीन, नीरज बबलू, जनक राम, कृष्णंदन पासवान, केदार गुप्ता, दिलीप जैस्वाल यांच्यासह १२ नावे आहेत. जेडीयूच्या कोट्यातून सुनील कुमार, लेशी सिंह, मदन साहनी, अशोक चौधरी, रत्नेश सदा, जामा खान, मदन साहनी आणि महेश्वर हजारी यांच्या नावांचा समावेश आहे.