कलम ३७० रद्द केल्यानंतर मोदी पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये

श्रीनगर, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हे ५ ऑगस्ट २०१९ रोजी हटवण्यात आले. कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यात श्रीनगरमध्ये एक सभा घेतली. श्रीनगरच्या बख्शी स्टेडियममध्ये ही सभा झाली. या सभेला तुफान प्रतिसाद मिळाला. मोदींना भेटण्यासाठी श्रीनगरमध्ये लाखोंचा जनसमुदाय आला होता. या निमित्ताने इमरान अजीजने […]

कलम ३७० रद्द केल्यानंतर मोदी पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये

श्रीनगर, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हे ५ ऑगस्ट २०१९ रोजी हटवण्यात आले. कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यात श्रीनगरमध्ये एक सभा घेतली. श्रीनगरच्या बख्शी स्टेडियममध्ये ही सभा झाली. या सभेला तुफान प्रतिसाद मिळाला. मोदींना भेटण्यासाठी श्रीनगरमध्ये लाखोंचा जनसमुदाय आला होता. या निमित्ताने इमरान अजीजने मोदींच्या स्वागतासाठी एक गाणे गायले.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरच्या प्रगतीला मिळाली गती
दहशतवाद कमी झाला
नागरिकांना स्वातंत्र्याचा आनंद अनुभवणे शक्य झाले
मुले शाळा महाविद्यालयात जाऊ लागली आहेत, शिक्षण घेऊ लागली आहेत
सुटीत मुलं बागडू लागली, मोकळेपणाने खेळू लागली आहेत
हे जम्मू काश्मीरचे नवे रुपडे, आता जम्मू काश्मीर मुक्त वातावरणात श्वास घेत आहे
जम्मू काश्मीरमध्ये पायाभूत क्षेत्रात अनेक विकासकामं सुरू आहेत
जम्मू काश्मीरमध्ये ६४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन
जम्मू काश्मीरमध्ये रोजगार निर्मितीला चालना
जम्मू काश्मीरची तरुणाई नवी स्वप्न बघू लागली आहे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करू लागली आहे
घराणेशाहीमुळे जम्मू काश्मीरमध्ये भ्रष्टाचार बोकाळला होता
जम्मू काश्मीर बँक आर्थिक अडचणीत सापडली होती
आता जम्मू काश्मीर बँकेला १७०० कोटी रुपयांचा नफा
घराणेशाहीला प्राधान्य देणाऱ्यांनी जम्मू काश्मीरच्या नागरिकांची अनेक वर्षे दिशाभूल केली
आता जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे
जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरात २ कोटींपेक्षा जास्त पर्यटक येऊन गेले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number