जळगाव, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : गृहमंत्री अमित शहा यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरु आहे. या दौऱ्यादरम्यान ते जळगाव येथे गेले असता त्यांनी सभा घेतली. जळगावमध्ये झालेल्या या सभेत त्यांनी तेथील जनतेला संबोधित केले. तसेच या युवा मोर्चात हजारोंच्या संख्येने लोकं सहभागी झाले. दरम्यान, सभेमध्ये बोलत असताना त्यांनी अनेक महत्वाची वक्तव्य केली.
गृहमंत्री शाहांच्या जळगाव दौऱ्यातील महत्त्वाचे मुद्दे
शिवरायांचे देशावर अनंत उपकार
ही निवडणुक भारताला २०४७ मध्ये विकसित बनवण्यासाठी
विरोधकांना कुटुंबाचेच कौतुक जास्त
युवकांच्या कल्याण्याची युवकांची काळजी नाही
मोदींनी देशाला विकासाच्या वाटेवर नेले
मोदींना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी झटूया
भारतानं पिओकेत शिरून सर्जिकल स्ट्राईक करून दाखवलं
२०१९ मध्ये कलम ३७० हटवलं
काश्मीरमधील जाळपोळ बंद
काश्मीर आपला आहे, काश्मीरचा भाग आपला आहे
मोदींनी देशाला समृद्ध बनवलं
३ टर्म तिसरी अर्थव्यवस्था मोदींची गॅरंटी
मोदींकडे पुढील २५ वर्षाचे व्हिजन आहे
५० वर्षापासून जनता पवारांना झेलत आहे
गरिबांच्या घरी पाणी पोहोचवलं
शरद पवारांनी ५ वर्षांचा हिशोब द्यावा
काँग्रेसने ७० वर्ष राम लल्लांना तंबूत ठेवलं
मोदींनी मातृशक्तीचा सन्मान केला
मोदींनी राम मंदिर बांधून दाखवलं
मविआ म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा
महाराष्ट्रात तीन पायांची रिक्षा चालत आहे
तीन वर्षात लाखांहून अधिक डॉक्टर बनतील