छत्रपती संभाजीनगर , ५ मार्च २०२४ , प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात यावेळी ३० लाख २२ हजार २२१ मतदार आहेत. यापैकी सर्वाधिक संख्या ३ लाख ८० हजार ११६ एवढे मतदार छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघात असून तर त्याखालोखाल गंगापूर विधानसभा मतदार संघात ३ लाख ४३ हजार ५४३ एवढी मतदार आहेत. सर्वाधिक महिला मतदार छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये असून त्यांची संख्या १ लाख ७९ हजार ७२४ एवढी आहे. तर तृतीयपंथी मतदारांची संख्यादेखील पश्चिममध्ये असून या मतदार संघात ७६ तृतीयपंथी मतदार आहेत.
असं आहे मतदान
छत्रपती संभाजीनगर मध्यमध्ये ३ लाख ४२ हजार ७ यापैकी १ लाख ७६ हजार ९० पुरुष तर १ लाख ६५ हजार ९१२ महिला मतदार आहेत. छत्रपती पश्चिममध्ये ३ लाख ८० हजार ११६ यापैकी संभाजीनगर पुरुष २ लाख ३१६ तर महिला १ लाख ७९ हजार ७२४, छ्त्रपती संभाजीनगर पूर्व मध्ये ३ लाख ३० हजार २६७ यापैकी पुरूष १ लाख ७२ हजार ७३४ तर महिला १ लाख ५७ हजार ५२३, कन्नडमध्ये ३ लाख २२ हजार ९६८ यापैकी १ लाख ६९ हजार ९८९ पुरुष तर १ लाख ५२ हजार ९७२ महिला मतदार आहेत. गंगापूर ३ लाख ४३ हजार ५४३ यापैकी पुरुष १ लाख ८० हजार ५०९ तर महिला १ लाख ६३ हजार १२, वैजापूर ३ लाख ८ हजार ४०९ यापैकी पुरुष १ लाख ६१ हजार ४९६ तर महिला १ लाख ४६ हजार ९१० आहेत.