छत्रपती संभाजीनगर, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांचे डिसेंबर महिन्याचे वेतन झाले नाही त्यामुळे बुधवार २४ जानेवारीपासून काम बंदचा इशारा परिचारिकांनी दिला आहे. घाटीत ७०० परिचारिका आहेत. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला त्यांचे वेतन होते. आता जानेवारी संपत आला तरीही डिसेंबर महिन्याचे वेतन त्यांना मिळालेले नाही. त्यामुळे घाटी रुग्णालयातील परिचारिका आक्रमक झाल्या […]
छत्रपती संभाजीनगर, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांचे डिसेंबर महिन्याचे वेतन झाले नाही त्यामुळे बुधवार २४ जानेवारीपासून काम बंदचा इशारा परिचारिकांनी दिला आहे. घाटीत ७०० परिचारिका आहेत. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला त्यांचे वेतन होते. आता जानेवारी संपत आला तरीही डिसेंबर महिन्याचे वेतन त्यांना मिळालेले नाही. त्यामुळे घाटी रुग्णालयातील परिचारिका आक्रमक झाल्या आहेत.