मुंबई, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मूत्रपिंडाच्या समस्येवर उपचार करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांच्या जामीन काळात सहा महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. नवाब मलिक यांच्या विषयीच्या वैद्यकीय अहवालाची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. सुनावणी झाली त्यावेळी मलिक यांनी वैद्यकीय कारण दिले तर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला त्यांची बाजू मांडण्यास सांगितले. ईडीने जामीन अर्जावर हरकत घेतली नाही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जामिनाच्या मुदतीत सहा महिन्यांची वाढ केली. नवाब मलिक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारात हात असल्याचा तसेच १९९२ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्यक्ती वा व्यक्तींसाठी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात नवाब मलिक काही काळ तुरुंगात होते. सध्या वैद्यकीय कारणामुळे मलिक जामिनावर आहेत.